(सिंधुदूर्ग)
पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.