रत्नागिरी : आगामी काळात भाजपा संघटन अधिक मजबूतीसाठी तसेच येत्या दोन महिन्यात नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या होणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘बुथ मजबूतीकरणा’वर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या पार्श्वभमुमीवर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान हाती घेण्यात आले असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दिपक पटवर्धन यांनी सांगितले आहे.
सोमवारी दि.२० रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात कार्यकारिणी ची बैठक संपन्न झाली. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत च्या कार्यक्रमाच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मा. जिल्हा अध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मंडल स्तरावर बैठका सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी मंडल अध्यक्ष यांच्याकडे संपर्प साधावा अशा सूचना ॲड. दिपक पटवर्धन यांनी केल्या. जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य म्हणुन आपला सहभाग या कार्यक्रमात असावा असेही सांगितले.
आपल्याकडे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ८५३ बुथ म्हणजे मतदान केंद्र आहेत. आपले नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे व त्याचा नंबर पत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपणास माहीती आहे. आपला बुथ मजबूत करण्यासाठी आपल्या बुथ वर बुथ प्रमुख, अधिक ३० सदस्य अशी बुथ रचना करायची आहे. याकरता आपल्या भागातील शक्ती केंद्र प्रमुखांबरोबर चर्चा करायची आहे. जिल्हा पदाधिकारी व सदस्य म्हणुन आपण आपला बुथ मजबूत करायचा आहे व त्याच बरोबर ५ बुथ ची जबाबदारी आपण स्विकारायची आहे. याबाबत आपण मंडल अध्यक्ष, बुथ रचना प्रभारी यांच्या कडुन आवश्यक माहीती घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.
येणा-या काळात प्रदेश संघटनेकडून खुप कार्यक्रम येणार आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पण कार्यक्रम केले जाणार आहेत. यासाठी आपला अमूल्य वेळ संघटनेला अपेक्षित असल्याचे ॲड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले. जिल्ह्यात ८५३ एकूण बुथ असून प्रत्येक कमीतकमी पाच कार्यकर्ते, असे किमान ४००० कार्यकर्त्यांमधुन ९० जणांच्या जिल्हा कार्यकारणीत कार्यकर्त्यांची निवड पक्षाने केली आहे. पक्षाचे कार्यक्रम या ४००० कार्यकर्त्यांपर्यंत संपर्प करण्यासाठीच सर्वांची पक्षाने विश्वासाने निवड केली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात नगरपरिषद च्या व नंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्या निवडणूका होणार आहेत. याकरता सर्व कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी जिल्हा बैठकीस व मंडल बैठकीस पदाधिकारी व सदस्य म्हणुन उपस्थिती महत्वाची राहणार आहे. येणाऱया भविष्यकाळात आपण जास्तीत योगदान पार्टी करता द्यावे, असे आवाहन भाजपा द.रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले आहे.