(देवरूख / सुरेश सप्रे )
रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत एस.आर.के तायक्वांडो संस्थेच्या सहकार्याने रत्नागिरी येथे आयोजित 21 सब-जुनियर आणि ज्युनियर 6 वी कॅडेट 10 वी जुनियर रत्नागिरी जिल्हा क्यूरोगी व पूमसे तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा सन 2023-24 छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल, मारुती मंदिर रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख, पी. एस. बने, निवे. लायन्स क्लब, या सर्व तायक्वांदो क्लबचे खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पुमसे प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
क्युरोगी प्रकारामध्ये पुढील खेळाडूंनी पदक पटकावले
पूर्वा वनकर-सुवर्णपदक, साहिल जागुष्टे – कांस्यपदक, दुर्गा मोघे= कांस्य पदक, सान्वी रसाळ= सुवर्णपदक, सान्वी जागुष्टे = सुवर्णपदक, श्रावणी इप्ते = कांस्य पदक, प्रथमेश शेट्ये= रौप्य पदक, ऋतिक रसाळ= कांस्य पदक, जुनियर मुले, तनिष खांबे = सुवर्णपदक, यश जाधव= सुवर्णपदक, राज रसाळ= सुवर्णपदक, गंधर्व शेट्ये= सुवर्णपदक, ओम घाग = रौप्य पदक, राज चव्हाण=कांस्य पदक
सिनियर मुले – वेदांत गिडीये= सुवर्णपदक, सुमीत पवार= रौप्य पदक, आशिष रसाळ=रौप्य पदक, राज रसाळ= रौप्य पदक, अविनाश जाधव= कांस्य पदक, साहिल घडशी = कांस्य पदक
पूमसे प्रकारामध्ये पुढील खेळाडूंनी पदक पटकावले
सब ज्युनिअर मुले वैयक्तिक
साहिल जागूष्टे= सुवर्णपदक
फ्री स्टाईल मुले वैयक्तिक –
आयुष वाजे = रौप्य पदक.
कॅडेट मुली वैयक्तिक –
श्रावणी इप्ते= कांस्य पदक, मृणाल मोहिरे= कांस्य पदक, श्रावणी इप्ते= रौप्य पदक, आयुष वाजे= रौप्य पदक, श्रावणी इप्ते= रौप्य पदक, सानवी रसाळ = रौप्य पदक, सान्वी जागुष्टे= रौप्य पदक, धनंजय जाधव= रौप्य पदक, यश जाधव= कांस्य पदक, तनिष खांबे= सुवर्णपदक, यश जाधव = सुवर्णपदक, अर्णव रेडीज= सुवर्णपदक, यश जाधव= रौप्य पदक, सिद्धी केदारी = सुवर्णपदक, साहिल घडशी = सुवर्णपदक, वेदांत गिडीये = सुवर्णपदक, अविनाश जाधव= सुवर्णपदक
या यशस्वी खेळाडूंना तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड ॲ.पूनम चव्हाण, आदींचे मार्गदर्शन लाभले. या सर्व पदक पटकाविलेल्या खेळाडूंचे तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आम. शेखर निकम, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी आदींनी अभिनंदन केले.