(रत्नागिरी)
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रल्वेत चढत असताना पडून गंभीर जखमी झालेल्या सिंधुदुर्ग येथील वृध्दाचा उपचारादरम्यान रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार २५ मे रोजी पहाटे घडली. लक्ष्मण दर्शन वालावलकर ( ६०,रा. रानबांबोळी कावळेवाडी कुडाळ, सिंधुदुर्ग) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने खबर दिली आहे.
त्यानूसार,बुधवार २४ मे रोजी सकाळी ९ वाजता त्याचे वडिल लक्ष्मण वालावलकर हे ओरोस सिंधुदुर्ग येथून दिवा पॅसेंजर या रेल्वे गाडीने रत्नागिरी येथे राहणारे त्यांच्या पाहुण्यांकडे आले होते. तिथून रात्री ९ वाजता ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे एर्नाकुलम निजामुददीन रेल्वेत चढत असताना पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून कमरेला घासले गेले होते.
त्यांना रेल्वे पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.