(रत्नागिरी)
सततच्या आजाराला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार सकाळी ८ वाजता घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन अर्जुन रोकडे ( ६०, रा. हरचेरी, रत्नागिरी ) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. गजानन रोकडे यांना सांधेदुखीचा त्रास होता. या आजाराला कंटाळून त्यांनी मंगळवार २३ मे रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे दाखल करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू येथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.