(पुणे)
पाकिस्तानच्या एजंटला गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी (4 मे) मोठी कारवाई केली. याबाबत एटीएसने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (DRDO) शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांना पुण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैज्ञानिक प्रदीप कुरुळकर याला पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिंग (PIO) च्या एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवले. यानंतर आरोपी शास्त्रज्ञ कुरुळकर भीतीपोटी त्याच्या (पाकिस्तान) व्यक्तीला डीआरडीओशी संबंधित गुप्त माहिती देत होता. त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यकर्त्यांशी व्हॉट्सअॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ इत्यादीद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधल्याचे आढळून आले.
Maharashtra | A DRDO scientist, who was working in one of the facilities of DRDO in Pune, has been arrested by ATS on the charges of espionage. He was found to have had contact with the operatives of Pakistan's Intelligence Agency through social media via WhatsApp messages, voice…
— ANI (@ANI) May 4, 2023
डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणा-या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रदीप कुराळकर हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) या विभागात काम करतात. कुरुळकर हनीट्रॅपमधे अडकून पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांसोबत व्हिडीओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे फेब्रुवारी महिन्यात भारतीय गुप्तचर संस्थांना लक्षात आले होते.
दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, जबाबदार पदावर असूनही डीआरडीओ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने संवेदनशील सरकारी गुपितांशी तडजोड केली, जे शत्रूराष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अधिकृत गुप्तता कायदा 1923 च्या कलम 1923 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी पुढील तपास करत आहेत.
The Anti-Terrorism Squad of Maharashtra Police, Kalachowki, Mumbai, has filed a case under Section 1923 of the Official Secrets Act 1923 and other relevant sections. Further probe is being done by investigating officer: Anti-Terrorism Squad (ATS)
— ANI (@ANI) May 4, 2023