(नवी दिल्ली)
ऑनलाईन परिषदा घेण्यासाठी झूम ॲप पुरवणाऱ्या झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स (झेडव्हीसी) कंपनीला आता संपूर्ण भारतात दूरध्वनी सेवा पुरवठा करण्याचा परवाना मिळाला आहे. झेडव्हीसी कंपनीने नुकतीच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनी आता बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील व्यावसायिकांना झूम फोन सेवा पुरवणार आहे.
अमेरिकेतील ही ‘झूम’ कंपनी आपल्या वेबसाईट ॲपमार्फत आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फन्सिंग सेवा पुरवत होती. मात्र आता या कंपनीला भारतीय दूरसंचार विभागाकडून संपूर्ण भारतात नॅशनल लॉंग डिस्टन्स (एनएलडी) आणि इंटरनॅशनल लॉंग डिस्टन्स (आयएलडी) माध्यमातून दूरध्वनी सेवा पुरवण्याचा परवाना मिळाला आहे. या परवान्यामुळे कंपनी आता क्लाऊड आधारित पीबीएक्स सेवा म्हणजेच झूम फोन सेवा पुरवू शकणार आहे. पीबीएक्स तंत्र एखाद्या स्थानिक टेलिफोन एक्स्चेंजप्रमाणे काम करते.