(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी दि. १ मे रोजी पार पडली. या मतमोजणीत टी.डी.एफ. प्रणित लोकशाही आघाडीने प्रचंड मताधिक्यान एकतर्फी क्रांतिकारी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उभ्या असलेल्या पतपेढी विकास आघाडी पॅनेल आणि स्व.रामनाथ मोते शिक्षण क्रांती पॅनेल या दोन्ही पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभूत करून पतपेढीच्या सत्तेच्या चाव्या लोकशाही आघाडीने आपल्या हाती घेतल्या. पतपेढीत सत्तापरिवर्तन झाल्याने लोकशाही आघाडीच्या प्रचारकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला.
या निवडणुकीत लोकशाही आघाडी पॅनेलचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण गटातील सागर मारुती पाटील,धनाजी दादा गिरी,रविंद्र भिकू हरावडे,विलास भिकू शिंदे,सुनिल रघुनाथ केसरकर,विजय महादेव वणवे, हिरालाल देवगोंडा चावरे,बिपीन यशवंत मोहिते,सुभाष रामचंद्र सोकासणे, दिनेश वासुदेव वेताळे, महिला प्रतिनिधी आशाराणी कुमार गावडे, मुनव्वर फिरोजखान तांबोळी,अनु.जाती/जमाती प्रतिनिधी प्रदिप पुनाजी वाघोदे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी संजय बाबाराम अवेरे, भटक्या व विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी किशोर प्रभाकर नागरगोजे या सर्वच्या सर्व १५ उमेदवारांनी ८०० मताधिक्य मिळवून विजय मिळविला.
पतपेढी सत्ताधारी संचालक मंडळाने गेली सहा वर्षे पतपेढीतील सभासदांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली होती. लोकशाही आघाडीने प्रचार सभेत प्रधान शाखेची दुरूस्ती,नोकर भरती प्रक्रिया, देवरूख शाखा विक्री घोटाळा, नोटा मोजणी यंत्र, ए.सी.खरेदी आर्थिक घोटाळा, फर्निचर व देखभाल दुरुस्ती लाखों रुपये खर्च, वारेमाप सभाखर्च, खुर्ची खरेदी व्यवहार, शाखा संचालकांची मनमानी इ. गंभीर प्रश्नांवर सभासदांचे लक्ष वेधून पतपेढीच्या सभासदांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचे निदर्शनास आणले.या सर्व गंभीर प्रश्नांवर सभासदांनी गांभीर्याने विचार करून या पंचवार्षिक निवडणूकीत माध्यमिक शिक्षकांनी लोकशाही आघाडीचा पुरस्कार केला.लोकशाही आघाडीचा जाहिरनामा पसंत केला. सभासदांच्या पैशाचे संरक्षण व्हावे, पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकशाही आघाडीच्या बाजूने सभासद मतदारांनी कौल दिला.पतपेढी विकास आघाडी तसेच शिक्षण क्रांती या दोन्ही पॅनेलना सभासदांनी पराभूत केले.
जिल्हा लोकशाही आघाडीत अनेक संघटना समाविष्ट झाल्या.यामध्ये रत्नागिरी जिल्हा टीडीएफ शिक्षक संघटना,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, जिल्हा कास्ट्राईब माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्हा ग्रंथपाल संघ व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ इ.संघटना मिळून लोकशाही आघाडी तयार करण्यात आली. या निवडणुकीत अखेर लोकशाही आघाडीने निर्विवाद एकतर्फी विजय मिळविला. या विजयासाठी लोकशाही आघाडीच्या सामुहिक प्रचार यंत्रणेने फार मोठे योगदान दिले.
लोकशाही आघाडीला विजयी करण्यासाठी सागर पाटील ( अध्यक्ष टीडीएफ),विजय पाटील (अध्यक्ष),रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, मिलिंद कदम,(राज्य संघटक, कास्ट्राईब )प्रदीप वाघोदे (अध्यक्ष) कॅस्ट्राईब माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र जिल्हा,शाखा रत्नागिरी, संदीप कांबळे (अध्यक्ष) शिक्षक सेना रत्नागिरी, लक्ष्मण गोरे(अध्यक्ष)रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघ ,इम्तियाज काझी (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, रत्नागिरी जिल्हा,विवेक महाडिक (अध्यक्ष) रत्नागिरी जिल्हा ग्रंथपाल संघ,जमालुद्दीन बंदरकर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष तथा कोकण प्र.अध्यक्ष यांच्यासह संभाजी देवकाते,रोहीत जाधव, महेश पाटकर,रामचंद्र महाडिक,आत्माराम मेस्त्री,गणपत शिर्के,अण्णा चावरे,सुरेश चिकणे व लोकशाही आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यानी महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे लोकशाही आघाडीला नेत्रदीपक यश प्राप्त झाले. लोकशाही आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी सुज्ञ आणि जाणकार मतदारांचे विशेष आभार व्यक्त केले.