(चिपळूण)
तालुक्यातील मोरवणे येथे अज्ञात कारणाने विष प्राशन केलेल्या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदेश सुरेश अदावडे (28, मोरवणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदवडे याने विष प्राशन केल्यानंतर त्यास उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती सुधारत नसल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.