(रत्नागिरी
रत्नागिरी शहरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात फिर्यादीची ऑनलाईन ५२ हजार ६४० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादींनी फेसबुकवर पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा ६ जी दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली. यानंतर फिर्यादींनी जाहिरातीखाली दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला. यानंतर या मोबाईल नंबरवर आकाश अनंत कुलकर्णी नावाच्या इसमाचा फोन लागला. या इसमाने आपण सोलापूर येथून बोलत असल्याचे सांगून अॅक्टिव्हा विकायची आहे, अशी बतावणी केली. यानंतर या इसमाने व त्याचा डिलिव्हरी बॉय नितीश कुमार यांनी दुचाकीची रक्कम फिर्यादी यांना क्युआर कोड गुगल पेवर पाठवण्यास सांगितली. यानंतर फिर्यादीच्या. पत्नीच्या बँक खात्यातून एकूण ५२ हजार ६४० गुगल पे द्वारे पाठवले गेले. मात्र या बदल्यात कोणतीही दुचाकीची देवाणघेवाण झाली नाही. या या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे