(नवी दिल्ली)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या सतवंत सिंगच्या पुतण्या बलतेजसिंगला न्यूझीलंडच्या ऑकलंडमधून अटक करण्यात आली. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी पोलिसांनी त्याचेवर अटकेची कारवाई केली. त्याच्याकडून 328 किलो मेथामफेटामाईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.
इंदिरा गांधींच्या हत्येपूर्वीच 1980 मध्ये सतवंतचा भाऊ कुटुंबासह न्यूझीलंडला गेला होता. ऑकलंडमध्ये त्याने किराणा माल स्टोअर सुरू केले. बलतेजसिंग याचा जन्म ऑकलंडमध्येच झाला. सतवंत याचा पुतण्या असल्याने बलतेजसिंगला तेथील स्थानिक गुरुद्वारांमध्ये मोठे महत्व देण्यात येत होते.
न्यूझीलंडमध्ये बलतेज सिंगची मालमत्ता अचानक वाढू लागली तेव्हा शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. बलतेजचे वडील रे व्हाईट नावाच्या रिअल इस्टेट फर्मचे मालक झाले. त्याने 100 कोटींहून अधिक किमतीचे घरही विकत घेतले. अटकेपूर्वी बलतेज फर्मचे काम पाहत होता. बलतेज सिंग हा न्यूझीलंडमधील भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक निदर्शनांमागील सूत्रधार आहे. याद्वारे तो पैसे गोळा करतो. सध्या तो तुरुंगात असून त्याच्यावर अमली पदार्थ तस्करीचा खटला सुरू आहे.