(नवी दिल्ली)
काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जबरस्तीने मौन राहिल्याने देशाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी मौन बाळगून आहेत. त्यांच्या सरकारच्या कामाचा परिणाम कोट्यवधी लोकांच्या जीवनावर होतो. प्रभावी मुद्द्यांवर कितीही न्यायप्रविष्ट प्रश्न विचारले तरी पंतप्रधान मौन बाळगतात, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी सोनियांनी सरकारवर संसदेतील विरोधकांचा आवाज दाबणे, एजन्सीचा गैरवापर करणे, मीडियाचे स्वातंत्र्य संपवणे, देशात द्वेष व हिंसाचाराचे वातावरण निर्माण करणे असे आरोप केले आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात पंतप्रधान अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर झाला
सोनिया गांधी यांनी लोकांच्या पैशांचा ४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कोणत्याही वादविवादाशिवाय मंजूर झाला, असाही आरोपही केंद्रावर केला आहे. भाजपा आणि आरएसएसने देशात जो द्वेष आणि हिसाचाराला प्रोत्साहन दिले होते ते आता वाढत आहे आणि पंतप्रधान त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे सोनिया म्हणाल्या. त्यांचे नेते एकदाही शांतता किंवा सौहार्द राखण्याबद्दल बोलले नाही किंवा दोषींना लगाम घालण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.
संसदेतील घटनाबद्दल गेल्या अधिवेशनात आम्ही सरकारची रणनीती पाहिली, ज्या अंतर्गत विरोधकांना बेरोजगारी, महागाई, सामाजिक विभाजन, अर्थसंकल्प आणि अदानी यासारखे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखण्यात आले. केंद्राने विरोधाला तोंड देण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला. यामध्ये भाषण बंद पाडणं, चर्चा थांबवणे, संसदेच्या मुद्यांवर हल्ला करणे आणि शेवटी काँग्रेस खासदाराला तडकाफडकी अपात्र ठरवणे यांचा समावेश आहे.
– सोनिया गांधी, माजी अध्यक्षा, कॉंग्रेस