(धामणपे / करण तावडे )
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होळीचा मांड येथे रविवारी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. ग्रामविकास मंडळ, धामणपे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीतील पालीच्या चरवलीचे सुरेश भोसले हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
सुरेश भोसले यांच्या बैलगाडीने जेतेपदावर नाव कोरले. 30 हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल देऊन गौरविण्यात आले. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी सकाळपासून हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. प्रगतशील व दानशूर व्यक्तिमत्त्व मधुकरराव गोमणे यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेत 61स्पर्धक सहभागी झाले होते.
होळीचा मांड येथे बैलगाडी शौकीन व मालक-चालक यांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. शर्यतीचे अप्रतिम देखणे संयोजन धामणपे ग्रामविकास मंडळ व पंच कमिटी यांनी केले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 61 बैलगाडी होत्या. त्यापैकी 9 जोड्या गावठी बैलगाडी व 52 खिलारी जोड्या (घाटी) सहभाग घेतला होता. गावठीसाठी 1,2,3 क्रमांकाला वेगळी बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हसन वाघारे यांनी पटकाविले. रोख रक्कम 25 हजार रुपये व मानाची ढाल देण्यात आली तर तृतीय क्रमांक पटकावला, तो विनायक जंगम यांनी 20 हजार रुपये रोख आणि मानाची ढाल देण्यात आली. चतुर्थ क्रमांक मिरा देसाई, पाचवा क्रमांक स्वराज गुरव, सहावा क्रमांक साहिल लाड, सातवा क्रमांक संजय सावंत, आठवा क्रमांक आकाराम कांबळे, नववा क्रमांक नितीन देसाई यांना रोख रक्कम व मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा शुभारंभ व पारितोषिक वितरण सोहळा खासदार विनायक राऊत व प्रसिद्ध उद्योजक मधुकरराव गोमणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावचे प्रमुख गावकर दिलीप तावडे व इतर गावकार, सेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, धामणपे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तावडे, दीपक राणे, सेक्रेटरी संजय तावडे, सुधाकर गांवखडकर, दशरथ शेट्ये, सदानंद गोमणे, प्रकाश आंबेरकर, विष्णू तानवडे, रामचंद्र पांचाळ, सुनील चव्हाण, वसंत गोमणे, विघ्नेश तावडे, यश तावडे, पोलीस पाटील सौ.रीना तावडे स्पर्धेचे पंच, डॉक्टर, नायब तहसीलदार, पोलीस, समालोचक व इतर गावचे ग्रामस्थ, कार्यकर्ते सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.