(मुंबई)
मुंबईतील उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या अंधेरीत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंधेरीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. याशिवाय वेश्याव्यवसायात अडकलेल्या एका मॉडेलची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.
अंधेरीच्या उच्चभ्रू परिसरात काही दलालांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची टिप्स मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपींना जाळ्यात अडकवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला घटनास्थळी बनावट ग्राहक म्हणून पाठवलं. यावेळी सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समजताच पोलिसांनी छापेमारी करत पाच आरोपींना अटक केली. याशिवाय वैश्याव्यवसायात अडकलेल्या एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Maharashtra | A high-profile sex racket was busted in the Andheri area. Three women including two senior citizens arrested for allegedly running the sex racket. Police also rescued a model. A case has been registered at Amboli Police Station against the arrested women: Mumbai…
— ANI (@ANI) April 6, 2023
आरोपींकडून गर्भश्रीमंत ग्राहकांना सेवा दिली जात होती, असं तपासातून स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी पुरुष वयोवृद्ध आहेत. त्यामुळं आता या घटनेमुळं अंधेरीसह मुंबईत खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.