(दापोली)
येथील बसस्थानकातून सकाळी १० वाजता सुटलेल्या पालवणीमार्गे मंडणगड बसचे स्टेअरिंग अडकल्याने तांबडी कोंडनजीक बस उजव्या बाजूला रस्ता सोडून ५ फूट खाली उतरली. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चालक नारायण कंटाळे हे दापोली – पालवणीमार्गे मंडणगड ही बस घेऊन मंगळवारी सकाळी १० वाजता दापोली बसस्थानकातून मार्गस्थ झाले. साडेदहाच्या सुमारास तांबडीकोडपुढील वळणावरून पुढे जात असताना या बसचे स्टेअरिंग अडकले. त्यामुळे बस उजव्या बाजूला डांबरी रस्ता सोडून ५ फूट खाली उतरली.
यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचा दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.