( चिपळूण )
मंदिराच्या बांधकामाचा आठ अ उतारा, नकाशा, संमतीपत्र, बक्षीसपत्र, 4 गुंठे व 3 गुंठे जागेचे खरेदीखत देवस्थान कमिटीकडे सुपुर्द न करता मूळ कागदपत्रे स्वत:कडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मारुती सुर्वे (पोसरे, सुंदरवाडी, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना 12 ऑगस्ट 2015 ते 25 मार्च 2023 दरम्याने घडली. याबाबतची फिर्याद सोमा भागोजी आदवडे (64, पोखाडेवाडी, पोसरे, चिपळूण) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पोसरे गाव येथील काजू वाकण (वझर फणसीचा माळ) येथे नवीन जागेत बांधलेल्या वाघजाई खेमदेवस्थान मंदिराच्या नवीन बांधकामाचे सातबारा, आठ अ, नकाशा संमतीपत्र, 4 गुंठ व 3 गुंठे जागेचे खरेदीखत, मंदिर बांधण्याचे परवानगी पत्र तसेच बांधकाम ठेकेदाराचा करारनामा व प्रोसेडिगची वही सर्व मूळ दस्तऐवज समितीच्या व गावातील लोकांच्या परवानगीने विश्वासाने विनोद सुर्वे याच्याकडे ठेवण्यासाठी देण्यात आला होता. मात्र ही कागदपत्रे विनोद याने देवस्थान समिती व गावातील लोकांचा विश्वासघात करुन कागदपत्रे समितीकडे सुपूर्द न करता स्वत:कडे ठेवून मूळ कागदपत्रांचा अपहार केला. या अपहार प्रकरणी विनोद याच्यावर भादविकलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.