( रत्नागिरी )
तालुक्यातील जाकादेवी येथे घरातील पर्समध्ये ठेवलेले मंगळसूत्र आणि रक्कम असा एकूण 91 हजार 250 रुपये किंमतीचां ऐवज चोरीस गेल्याची घटना 20 मार्च रोजी रात्री 8 ते सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ सिताराम बने (68, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वर्षा व्यंकट चव्हाण (59, जाकादेवी रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.