( रत्नागिरी / प्रतिनिधी )
बदलते हवामान आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्दी-खोकल्याचे रूग्ण वाढल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळी थंडी, तर दिवसभर उष्मा वाढला आहे. त्यातच अधूनमधून मळभ येत आहे. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला व ताप येत आहे. हा त्रास किमान आठवडाभर जात नसल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. या वाढत्या आजाराने खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. शिंका, खोकला आल्यावर रुग्णांकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने हा आजार पसरत आहे. त्यामुळे आजारी व्यक्तींनी फिरू नये, शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. बहुतांशी शाळांमधील विद्यार्थीही आजारी असल्याने सर्वांना लागण होत आहे.