प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. EPFO नं कर्मचाऱ्यांसाठी हायर पेंशन स्कीमचा फायदा घेण्यासाठी अजून एक संधी दिली आहे. म्हणजे याआधी ज्या कर्मचाऱ्यांना या स्कीमचा फायदा घेता आला नाही ते 3 मे पर्यंत या स्कीममध्ये रजिस्टर करू शकतात. इथे आम्ही तुम्हाला EPFO च्या पेंशन स्कीमची सविस्तर माहिती दिली आहे, ज्यात अर्ज करण्याची पद्धत देखील सांगण्यात आली आहे.
EPFO ची हायर पेंशन स्कीम काय आहे
EPFO प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेंशन फंड (EPF) आणि पेंशन स्कीम (EPS) मॅनेज करते. प्राइव्हेंट कर्मचाऱ्यांना 58 वर्ष पूर्ण झाल्यावर EPFO कडून पेंशन मिळते. तसेच प्रोविडेंट फंडमधील जमा झालेली कर्मचाऱ्यांची रक्कम देखील निवृत्तीच्या वेळी मिळते. EPFO मध्ये हे पैसे कर्मचारी आणि कंपनी दोन्ही जमा करतात.
हायर पेंशन स्कीमसाठी अर्ज कसा करायचा
स्टेप 1: हायर पेंशन स्कीमसाठी कंप्यूटरच्या ब्राउजरमध्ये ऑफिशियल EPFO Unified Member portal ओपन करा.
स्टेप 2: इथे होम पेजवर ‘Application form for joint option’ (अॅप्लीकेशन फॉर्म फॉर जॉइंट ऑप्शन) वर क्लिक करा.
स्टेप 3: जर तुम्ही 2014 पूर्वी रिटायर्ड होत असाल तर तुम्हाला ‘Validation of joint options who retired before 01.09.2014 and exercised joint option’ वर क्लिक करावे लागेल. जर तुम्ही 2014 नंतर रिटायर्ड होणार असाल तर तुम्हाला ‘Exercise of joint option for employees who were in service prior to 01.09.2014 and continued to be in service 01.09.2014 but could not exercise the joint option’ वर क्लिक करावं लागेल.
स्टेप 4: अॅप्लीकेशन फॉर्म सावधपूर्वक भरा आणि आवश्यक डॉक्यूमेंट अपलोड करा.
हायर पेंशन स्कीमसाठी केलेला अर्ज आणि कागदपत्र रीजनल पीएफ कमीशनर तपासातील. प्रत्येक अर्ज ऑनलाइन केला जाईल आणि अॅप्लीकेशन कर्मचाऱ्याच्या कंपनीला पाठवला जाईल, जिथे इ-साइनच्या माध्यमातून व्हॅलिडेट करावं लागेल. प्रोसेस पूर्ण झाल्यावर एसएमएसच्या माध्यमातून सूचना मिळेल.
EPF कॉन्ट्रिब्यूशन कॅल्क्युलेशन
EPF मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी आणि डियरनेस अलाउन्स (DA) चा 12 टक्के भाग जमा केला जातो. यातील कर्मचाऱ्यांचं संपूर्ण योगदान EPF (प्रोविडेंट फंड) मध्ये जातं. तर कंपनीकडून येणारं 12 टक्के योगदान संपूर्ण ईपीएफमध्ये न जाता 3.67 टक्के EPF मध्ये आणि 8.33 टक्के EPS मध्ये जातं. तसेच केंद्र सरकार देखील कर्मचाऱ्यांच्या EPS मध्ये 1.16 टक्के योगदान देतं.
EPS ची गणना
कर्मचाऱ्यांच्या EPS साठी दरमहा 15,000 रुपयांची मर्यादा ठरली होती. म्हणजे पगार कितीही असाल तरी EPS योगदानाची गणना 15,000 रुपयांवरून होत होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानंतर हायर पेंशन स्कीमवर रजिस्ट्रेशन करता येईल. EPFO नं 20 फेब्रुवारीला जारी केलेल्या सर्कुलर नंतर आता 8.33 टक्के कपात 15,000 रुपयांच्या ऐवजी कर्मचाऱ्यांच्या खऱ्या बेसिक सॅलरीच्या आधारावर होईल.
पात्रता
EPFO च्या हायर पेंशन स्कीम अंतगर्त आशा कर्मचाऱ्यांची विनंती मान्य केली जाईल ज्यांना कर्मचारी भविष्य निधी (EPF) अंतर्गत पेंशन स्कीममध्ये जास्त योगदान दिलं आहे आणि रिटायरमेंट पूर्वी वाढीव पेंशन कव्हरेजचा ऑप्शन निवडला आहे.
आवश्यक डॉक्यूमेंट
हायर पेंशन स्कीमसाठी कंपनीनं व्हेरिफाय केलेलं EPF स्कीमच्या पॅरा 26(6) अंतगर्त जॉइंट ऑप्शनचं प्रमाणपत्र, कंपनीनं व्हेरिफाय केलेलं तत्कालीन पॅरा 11(3) अंतगर्त जॉइंट ऑप्शन प्रमाणपत्र द्यावं लागेल. तसेच 5000 /6500 रुपयांच्या वेतन मर्यादेपेक्षा जास्त वेतन EPF मध्ये जमा करण्याचं प्रमाणपत्र, 5000 रुपये/6500 रुपयांच्या वेतन मर्यादेपेक्षा जास्त योगदान EPS मध्ये करण्याचं प्रमाण द्यावं लागेल. तसेच कर्मचाऱ्याला हायर पेंशन रिक्वेस्टसाठी एपीएफसी या ईपीएफओच्या उच्च अधिकाऱ्यांना लिखित NOC द्यावी लागेल.