(मुंबई)
सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब भवनात पक्ष प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
भूषण देसाई म्हणाले, ”बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी आधीपासून काम केलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत आवडल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. मी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, हा माझा स्वतंत्र निर्णय आहे”, असंही ते पुढे म्हणाले.
प्रवेशानंतर शिवसेनेत जबाबदारी काय असणार? या प्रश्नावर बोलताना ते भूषण देसाई म्हणाले, ”एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी समर्थपणे पार पाडणार आहे”.