(देवरूख / सुरेश सप्रे)
जोपर्यंत जीवात जीव असेपर्यंत शिवसेनेची साथ सोडणार नाही आणि गतवैभव परत मिळवल्याशिवाय डोळे मिटणार नाही, असे भावनिक उद्गार माजी उद्योग मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली ५७ वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत आहे. धनुष्यवाण आणि शिवसेना नाव आणि नावही या गद्दारांना चोरले; त्यांना धडा शिकविणेसाठी आपण एकजूट दाखवत काम केले पाहीजे. त्यासाठी प्रत्येकाने त्यागाची तयारी ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले. देवरूख मराठा भवन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवगर्जना यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते.
गद्दारांना हाताशी धरून भाजपाने सेना संपविणेची चालवलेली मोहीम कधीही सफल होणार नाही. मात्र त्यावेळी या गद्दारांना कोणही वाली नसेल. तेव्हा निष्ठावंत राहूनच काम केले तर परत उंच भरारी घेत महाराष्ट्रावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता मेहनत घेवून काम कराल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. कोकणी जनता सुज्ञ आहे. अनाजीपंतांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांचे राज्य सत्तेवरून खाली खेचणाऱ्या गद्दारांना गाडून सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास महीला संघटक सौ. नेहा माने यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील सुमारे ८००चे वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.