(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूखात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज टेम्पो संघटनेच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. देशाच्या इतिहासात महाराजांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. इतिहासात विशेष रस नसणाऱ्या, वाचनाची आवड नसणाऱ्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य असणाऱ्या, तसेच किशोरवयीन मुलां-मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक मावळे त्यांचा निर्धार, परिश्रम, चारित्र्य, नेतृत्वगुण इत्यादी गुणांची आणि मूल्यांची सर्वांना ओळख व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन सर्वाना चारित्र्य संपन्न, कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी, या उदशाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शिवरायांच्या शूरवीर मावळ्यांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहचणे करणे अगत्याचे वाटते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यावरील पोवाडयाचे व महिलांची रस्सीखेच स्पर्धेचेही या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजन केले आहे असे संघटनेचे अध्यक्ष अजित गवाणकर यांनी सांगितले.