(खेड / प्रतिनिधी)
जिल्ह्याला भूषणावह अशी गोष्ट खेड भरणे येथील पाचवीत शिकणाऱ्या तरुणाने केली आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय रॉकेट मेकिंग मिशन परीक्षेत खेड तालुक्यातील भरणे – बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूलमधील पाचवीत शिकणाऱ्या आराध्य मेहता याने १७ वा क्रमांक पटकावला. त्याची राष्ट्रीय स्तरावर पिको उपग्रह बनवण्यासाठी निवड झाली आहे. त्याला सर्वांत लहान बालवैज्ञानिक म्हणून गौरवले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 हा महत्वाकांक्षी प्रकल्प माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीचे एक पाऊल आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या यशामुळे आराध्य याला चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष वापरात येणारे रॉकेट बनवण्याची संधी मिळाली आहे. या रोकेटच वजन २२.५ केजी असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्यानंतर रॉकेटचे वजन 45 ते 60 केजी असेल. या रॉकेट 19 फेब्रुवारी 2023 रोजी तमिळनाडू मधील कांचीपुरमजवळील पट्टीपुर येथून अवकाशात सोडले जाईल. हे रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळवण्यात आल्या आहेत.