( रत्नागिरी )
तालुक्यातील पाली बाजारपेठ येथे अवैधरित्या चालणाऱ्या जुगारावर ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई कली. प्रकाश काना कांबळे (५७, रा. हातखंबा बौद्धवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील पाली बाजारपेठ येथे अवैधरित्या जुगार चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी हा अवैधरित्या जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.