रत्नागिरी शहरातील लसीकरण प्रभागनिहाय व्हावं यासाठी रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहरध्यक्ष व नगरसेवक यांनी केली मागणी केली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापूरकर यांची आज भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये आम्ही जागा उपलब्ध करून देतो तुम्ही आम्हाला केंद्र करून द्यावे अशी प्रमुख मागणी केली आहे.
यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष उदय बने, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन करमकर, तालूकाध्यक्ष व नगरसेवक मून्ना चंवडे, नगरसेवक राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, मानसी करमकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर उपस्थित होते. यावेळी हा पँर्टन जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्यामध्ये राबविण्यात येईल असे आश्वस्थ केले आहे.