(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिह्यासाठी नव्याने फेज 8 मध्ये 190 बीएसएनएलचे टॉवर मंजूर करण्यात आले आहेत़. यामुळे ग्रामीण भागातही बीएसएनएलचे टॉवर उभे राहण्यास मदत होणार आह़े. त्यामुळे आता ग्रामीण भागातही बीएसएनएलची रेंज चांगल्या प्रकारे मिळणार असून या टॉवरच्या माध्यमातून 4 जी सेवा ग्राहकांना उपलब्ध होणार आह़े.
सन 2022मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी 4 जी बीएसएनएल टॉवर कॅट 1 मधून नवीन 92 व अपग्रेड 38 टॉवर मिळाले. तर कॅट 2 मधून 98 नवीन टॉवर व 23 अपग्रेड करणे असे नवीन टॉवर एकूण 190 व जुने टॉवर 4 जी करणे असे 61 टॉवर मिळून 251 बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर करुन झाले आहेत़. त्यांची मंजूर यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.