( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे, पाडावेवाडी येथे 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरच श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी आयोजित व कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांच्या सहकार्याने नमन कलावंतांसाठी जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचा रंगणार आहे.
या उत्सव मंडळातर्फे यापूर्वी देखील अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून याठिकाणी कलाकारांना, लोककलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा पयास मंडळातर्फे करण्यात आलेला आहे. खेळ, नृत्य, ढोल वादन, नाट्य, भजन, आणि कोकणातील पारंपारिक नमन कलेला स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मोलाची भूमिका केली जात आहे. या नमन स्पर्धेत जिल्ह्यातील विविध नमन मंडळांनी सहभाग घेत आपल्या कलेचा अविष्कार करून रसिकजनांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. मर्यादीत वेळेत कला सादरीकरणाच्या या नमन स्पर्धेतील अव्वल व सहभागी नमन मंडळांचा यथेच्छ गौरव उत्सव मंडळातर्फे करण्यात आलेला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर यावर्षीही माघी गणेशोत्सवानिमित्त पुन्हा जिल्हास्तरीय नमन स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत 10 नमन मंडळांचा सहभाग आणि दरदिवशी दोन नमन मंडळांचे सादरीकरण असा कार्यकम होणार आहे.
या माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी 24 जानेवारी रोजी श्रीं चे आगमन, बुधवार 25 जानेवारी रोजी सकाळी श्रीं.ची पतिष्ठापना, सायंकाळी भजनाचा कार्यकम, त्यानंतर रात्रौ जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे उद्घाटनाचा कार्यकम होणार आहे. 26 रोजी सायंकाळी भजनाचा कार्यकम, 27 रोजी सायंकाळी भजनाचा कार्यकम, त्यानंतर नमन सादरीकरण, 28 रोजी सायंकाळी हळदीपूंकू, भजनाचा कार्यकम व त्यानंतर नमन सादरीकरण, 29 जानेवारी रोजी सकाळी रक्तदान व आरोग्य शिबिर, सायंकाळी भजनाचा कार्यकम त्यानंतर नमन सादरीकरण. 30 जानेवारी रोजी सायंकाळी भजनाचा कार्यकम व त्यानंतर नमन सादरीकरण. 31 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, आणि रात्रौ 9 वा. मान्यवरांच्या हस्ते नमन स्पर्धेचे बक्षिस वितरण आणि मुलांचे सांस्कृतिक कार्यकम होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सायं. 4 वा. श्रींची विसर्जन मिरवणूकीचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांचा सर्व भाविक, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष दिपक गावकर यांनी केले आहे.