( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतील आझाद कॉलनी येथून दुचाकी चोरीस गेल्याची घटना 4 जानेवारी दुपारी 3 ते 4 जानेवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अमान नौशाद शेकासन (रा. आझाद कॉलनी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमान शेकासन यांनी राहत अपार्टमेंट येथील बिल्डिंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. पार्किंगमधील दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच अमान यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादवीकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.