(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील आरोग्यवर्धीनी केंद्र कापरे येथील रुग्णांचे रक्त प्रमाण तपासणी साठी लागणारे HB मिटर आणि स्ट्रीप महाग आहेत. त्यामुळे खाजगीमध्ये खरेदी करून त्याचा वापर करणे खर्चिक आहे. अशातच आरोग्य केंद्रात नियमित सेवा मिळत असल्याने रुग्णांची संख्या ही वाढत आहे.
या सर्वांचा विचार करून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य केंद्रातून अनेक नवनवीन योजना आखून रुग्णांची गैरसोय टाळली जाते. यामध्ये आत्ता लायनेस क्लब चिपळूण च्या अध्यक्ष श्रीम. पेढामकर मॅडम यांनी पुढाकार घेऊन आरोग्य केंद्राला क्लबच्या वतीने 100 HB स्ट्रिप उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच या नंतर HB मिटर ही देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे आरोग्य केंद्र कापरेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश यादव यांनी पेढामकर मॅडम यांचे स्वागत केले व आरोग्य केंद्राचे वतीने त्यांचेसह त्यांच्या टीमचे आभार मानले.