( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील मिरकरवाडा जेटी येथे
गांजा बाळगणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शहबाज मुबारक हकीम (वय २२, रा. पठाणवाडी, पेठकिल्ला, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.
१५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास
पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान शहबाज मुबारक हकीम मलबारी जेटी येथे एक गुंडाळलेला पेपर पेटवून काहीतरी तोंडाने ओढत असल्याचे दिसले. पोलिसाना संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या हातात एक धुर येत असलेला गुंडाळेला पेपर होता. त्याच्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली. त्यांनी पोलिसांनी शहर पोलिस निरीक्षकांना मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यानंतर हकीम याची झडती घेतली त्याच्याकडे एक लायटर, एका प्लॅस्टिकच्या छोट्या पारदर्शक पिशवीत उग्र वासाची पाने-फुले असलेला राखाडी रंगाचा गांजा सदृश्य पदार्थ, एक फिल्टर पेपर, तसेच फोल्डींग बॉक्स मिळून आला. त्याचे वजन केले असता ३ ग्रॅम झाले. पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्याकडील अमंली पदार्थ (गांजा) जप्त केला.
या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपराज पाटील यांनी केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल मंदार मोहिते यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट १९८५ कलम ८ (क) २७अन्वये गुन्हा दाखल केला होता. सोमवारी (ता. २) या खटल्याचा निकाल न्यायालय वर्ग १ न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल साळवी, लिंगायत यांनी काम पाहिले.