( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील खेर्डी येथील रेल्वे पुलाच्या ट्रॅकवर तरुण मृतावस्थेत आढळून आला. ही घटना 20 डिसेंबर रोजी पहाटे 4 ते 6.30 वा. च्या सुमारास घडली. भूषण निंबा मोरे (28, खेर्डी विकासवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण मोरे हा घरातून निघून गेला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेउनही तो सापडला नाही. मात्र तो खेर्डी रेल्वे पुलाच्या ट्रॅकवर मयत स्थितीत आढळून आला. कोणत्यातरी ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असा असावा अंदाज व्यक्त होत आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.