(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या मॅजिक गार्डनचा उद्या मंगळवारी 7 वर्षाचा प्रवास पूर्ण करुन 8 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुमारे दोन एकर जागेवर आंब्याच्या बागेमध्ये मॅजिक गार्डन नावाने सुंदर बाग तयार केली आहे आणि एरव्ही केवळ शहरांमधील मॉलमध्ये असणारे शो येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य परिसरात अनुभवता येतात.
डॉयनॉसाॅरची अनुभूती देणारा थ्रीडी शो, हसवता हसवता हातचलाखीने फसवणारा मॅजिक शो, घोस्ट इंन कोंकण हा थरारक हॉरर शो, लाईट आणि मिररचे सुंदर कॉम्बीनेशन असणारा इन्फिनिटी हॉल, सत्य आणि भ्रम यातमध्ये हरवून टाकणारा मिररमेज आणि खिळवून ठेवणारा वोरटेक्स टनेल हे शो आणि असंख्य सेल्फी पॉईंट यामुळे मॅजिक मार्डन पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत रोषणाई व फुलझाडांनी गार्डन सजविण्यात आली आहे. बालदोस्तांचे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात येणार असून येणाऱ्या पर्यटक प्रत्येक फॅमिलीचे मोफत फोटो काढून स्वागत केले जाणार आहे. मॅजिक गार्डनची आठवण म्हणून त्यांना ती फोटो प्रिंट मोफत दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना वैभव सरदेसाई म्हणाले की, निसर्गपूरक पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती हे आपले ध्येय असून मॅजिक गार्डन हे पर्यटनाचा सकारात्मक पैलू आहे. या गार्डनसाठी राम शेंड्ये यांनी जागा उपलब्ध करून दिली असून त्यांचे नेहमीच सहकार्य असते असेही श्री. सरदेसाई यांनी सांगितले.