कुवारबाव चे माजी सरपंच मामा मयेकर यांची गेले काही दिवस प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रत्नागिरी च्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मामा मयेकर यांनी कुवारबाव च्या सरपंच पदावरून काम करताना आपल्या कामाची चुणूक दाखवली होती.
अनेक लोकोपयोगी कामे मामा मयेकर यांच्या कारकिर्दीत झाली होती.लोकांना अपेक्षित असलेला कारभार करण्यात मामा ना यश आलं होतं. कुवारबाव परिसरातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. कुवारबावमध्ये होणाऱ्या सगळ्या उत्सवात मामा मयेकर सक्रिय सहभागी असायचे. कुवारबावप्रमाणे गवळीवाडा तेथील कार्यक्रमात आणि मंडळात ते सक्रिय होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कर्मचारी म्हणून अनेक वर्षे काम केल्यानंतर निवृत्ती नंतर मामा राजकारणात सक्रिय झाले होते.
मामा मयेकर यांच्या जाण्याने कुवारबाव पंचक्रोशीतील एक उत्साही कार्यक्रता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मामा मयेकर उदय सामंत यांचे खंदे समर्थक होते. मामा मयेकर यांच्या जाण्याने कुवारबाव परिसरावर शोककळा पसरली आहे.