(मुंबई)
देशभरातील कोट्यावधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता सरकार चुकीच्या मार्गाने रेशन मिळवणाऱ्या लोकांचे रेशन बंद करणार आहे. सरकारने अलीकडेच देशभरातून १० लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचे आढळून आले, त्यांच्याकडून सरकार रेशनची मागील वसुलीही करणार आहे.
एनएफएसएनुसार जे कार्डधारक आयकर भरतात, याशिवाय ज्यांच्याकडे १० एकरांपेक्षा जास्त जमीन आहे, अशा लोकांची यादी तयार केली जात आहे. त्याचबरोबर ज्यांनी गेल्या ४ महिन्यांत रेशन घेतलेले नाही, अशा लोकांचीही शिधापत्रिका रद्द करणा-यांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर काही लोक असे आहेत, जे मोफत रेशनचा व्यवसाय करतात. अशा लोकांचीही सरकारकडे यादी आहे. तर शिधापत्रिका धारकांची पात्रता तपासण्याचे काम सुरू असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.