(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या आत्महत्याच प्रमाण वाढलं आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत केवळ रत्नागिरीतच ५ ते ७ आत्महत्या झाल्याचं दिसून येत आहे. आता
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे कोठारवाडी येथे नवदांपत्याने रविवारी पहाटे 5.30 वा.च्या सुमारास नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या आत्महत्येचे नेमकं काय कारण असेल? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. अवघ्या दोन महिन्यात आत्महत्या करण्याची अशी कोणती वेळ आली, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संदीप जयवंत गोताड ( 27) व पत्नी पूजा संदीप गोताड अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांनी घरच्या वाश्याला गळफास लावून आत्महत्या केली.
खंडाळा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी संदीप व त्याची पत्नी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. सुमारे दोन महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते.अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.