(राजापूर)
राजापूर एसटी डेपो अधिकारी वर्गाचे नाव पुढे करीत महीना पास असलेले पार्सल गाडीत घेण्यास नकार देणारे राजापूर एसटी डेपोचे वाहक श्री.नदाप यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी जैतापुरचे माजी सरपंच गिरीष करगुटकर यांनी एसटी प्रशासनाकड़े केली आहे.
याबाबत जैतापुरचे सरपंच गिरीष करगुटकर यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही माडी व्यावसायिक महीना पास घेऊन एसटीवरुन माडी पार्सल वाहतूक करतो. गेली कित्येक वर्षे एसटी प्रशासन आम्हाला चांगली सेवा देत आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात शासनाची सर्व फी भरलेल्या माडी व्यावसाईकानी मोठ्या अडचणीना तोंड देत कसबसा हा व्यवसाय सुरु ठेवला आहे. यावर अनेकांचा उदरनिर्वाह सुरु आहे.
अनेक वर्षे एसटीवरुन ही सेवा नियमित सुरु असताना, तसेच एसटी चे जिल्हाभरातील सर्व चालक/वाहक संपूर्ण सहकार्य करीत असताना मात्र राजापूर डेपोचे वाहक श्री.नदाप हे आपणच काहीतरी मेहेरबानी करतो आहोत अश्या आविर्भावात वर्तवणुक करीत असल्याचा आरोप करगुटकर यांनी केला आहे. माडी व्यावसायिक श्री.नारायण करगुटकर हे स्वतः आपले पार्सल घेऊन जात असताना नदाप यांनी त्यांच्याशी गैरवर्तणूक करीत त्यांचे पार्सल नाकारत त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याने त्यांनी यापूर्वीच त्यांची तक्रार एसटी प्रशासनाकडे केलेली आहे. आज आपले पास असलेले करगुटकर यांचे पार्सल राजापुर डेपोचे अधिकारी श्री.मोरे यांनी आपल्याला घेऊ नये, असे सांगत घ्यायला नाकारले.
यापूर्वीच आपली एक तक्रार झाली असून आपण हे पार्सल घेऊन जाणार नाही, असा पवित्रा घेतला मात्र त्याचे पास आहेत, तुम्हाला हे पार्सल घेऊन जावेच लागेल असा पवित्रा करगुटकरांसहित उपस्थितानी घेतल्यावर एसटी टपावरुन ही पार्सल सेवा स्विकारली.
गेल्या दोन वर्षातील कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय संकटात सापडले आहेत. अनेक व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यात अश्या काही अधिकारी/ कर्मचाऱ्यामुळे तर त्यात आणखीनच भर पड़त आहे. अनेक अडचणींवर मात करीत एसटी प्रशासन अत्यंत प्रभावीपणे आपली सेवा देत आहे. प्रवाशांना अनेक प्रकारच्या योजना जाहीर करीत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे. अश्यावेळी काही कर्मचारी जर प्रवाशांशी असे उद्दाम वागत असतील तर त्यांच्यावर सखोल कार्यवाही झाली पाहिजे अशी अपेक्षा सर्व थरातून व्यक्त होत आहे.