(मुंबई)
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इंदौर पोलिसांनी अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरण तिचा माजी प्रियकर राहुल नवलानी याला इंदौरमधून अटक केली आहे. या प्रकरणात राहुल नवलानी हा मुख्य आरोपी आहे. वैशालीने तिच्या सुसाइड नोट आणि पर्सनल डायरीमध्ये काही गोष्टी लिहिल्या होत्या, त्यावरून राहुल नवलानी याला अटक करण्यात आली आहे.
राहुल नवलानीमुळे वैशाली त्रस्त होती. त्यामुळेच वैशालीने इंदौरमधील तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप होत होते. तर राहुल नवलानी हा ब्लॅकमेल करत होता आणि त्यामुळेच वैशालीने आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला. इंदौर पोलिसांचे म्हणणे होते की, या प्रकरणात राहुलचं नाव आल्यानंतर तो देश सोडण्याच्या तयारीत होता. वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लग्नासाठी आपल्या घरी गेलेल्या वैशालीच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला.
वैशाली ठक्करचा भाऊ नीरजने नुकतंच सांगितलं होतं की, चार दिवसानी वैशालीचं लग्न होतं. त्याआधीही राहुलमुळे एकदा वैशालीचं लग्न मोडलं होतं. त्यामुळे तिला धक्का बसला होता. वैशालीनेसुद्धा तिच्या सुसाइड नोटमध्ये राहुल कसा छळ करत होता ते लिहिलं आहे.