(करिअर)
बेरोजगार तरुण तरुणींसाठी एक सुवर्णसंधी आहे. आयटीआय झालेले विद्यार्थी या क्षेत्रासाठी अर्ज करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किंवा ECIL ने अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण शिकाऊ उमेदवारांच्या 284 पदांची भरती केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट ecil.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कालपासून 27 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
या पदांसाठी होणार भरती :
▪️ इलेक्ट्रिशियन : 50
▪️ इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक : 100
▪️ फिटर : 50
▪️ एमएमव्ही : 01
▪️ टर्नर : 10
▪️ मशीनिस्ट : 10
▪️ मशीनिस्ट जी : 03
▪️ कारपेंटर : 05
▪️ COPA : 01
▪️ SMW : 01
▪️ वेल्डर : 05
▪️ पेंटर : 03
शैक्षणिक पात्रता
भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवारानं मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
ही असेल वयोमर्यादा
उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षे असावं. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष आणि SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि या पदांसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 28 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे . उमेदवारानी अधिक माहितीसाठी अधिकृत साइटची मदत घ्यावी.