(चिपळूण)
लोकजागृती फाऊंडेशन रत्नागिरी यांचे विद्यमाने आणि नॅब आय हॉस्पिटल चिपळूण व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरूख यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व तदनंतर मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 164 नागरिकांनी तपासणी करून घेतली, तर 48 नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. त्यातील 18 रुग्णांना लगेचच शस्त्रक्रियेसाठी नॅब आय हॉस्पिटल चिपळूण येथे अडमिट करण्यात आले. उर्वरित नागरिकांची टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया होणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडउमरे यांनी उत्तम नियोजन आणि प्रचार प्रसार केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दाखवली,असे लोकजागृती फाऊंडेशन च्या अध्यक्ष सौ. मीनल काणेकर यांनी सांगितले. या वेळी रूग्ण कल्याण समितीच्या माजी अध्यक्ष रचना महाडिक याची उपस्थिती लाभली. त्यांनीही या शिबिराचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. हे संपूर्ण शिबिर संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि आरोग्य सेवक कमलेश कामतेकर यांच्या प्रयत्नाने शक्य झाला.
या वेळी नॅब हॉस्पिटल व्यवस्थापक संदीप नलावडे, श्री. जाधव लोकजागृती फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष परशुराम निवेंडकर, सदस्य नरेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष ठिगळे, डॉ. भाग्यश्री गायकवाड, आरोग्य सहाय्यक श्री. खांडेकर, श्री. सावंत, आरोग्य सेवक श्री. जाधव व आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.