(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे मुरादपूर विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा पार पडली. या सभेचे औचित्य साधुन मुरादपुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व रत्नागिरीच्या माजी जि.प. अध्यक्षा सौ. रश्मीताई कदम यांचा ६०वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार श्री. प्रमोद जठार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन, भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश कदम, हातीव सरपंच श्री. नंदूभाई कदम, मुरादपुर उपसरपंच श्री. परशुराम चोगले, हरपुडे सरपंच सौ. गुरव मॅडम, निवे सरपंच सौ. गुरव मॅडम, सर्व कार्यकारी मंडळ व पोलीस पाटील व हातीव, मुरादपुर, हरपुडे, बेलारी, कुंडी, निगुडवाडी, तामनाळे येथील ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन व माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांनी हातीव ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. त्यावेळी सरपंच श्री. नंदूभाई कदम यांनी स्वागत केले व गावाच्या विकासाच्या अनुषंगाने विविध गोष्टींवर चर्चा केली. दिपक पटवर्धन व प्रमोद जठार यांनी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ग्रामस्थांसमवेत सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.