(क्रीडा)
भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला हॉकीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ‘करो वा मरो’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी कॅनडाचा 3-2 असा पराभव करत अंतिम चार संघांतील स्थान निश्चित केले. सेमीफायनलमध्ये शुक्रवारी भारतीय महिलांची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पडणार आहे.
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटात सलिमा टेटेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये नवनीतने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. स्टेअर्सने गोल करून आघाडी 2-1 ने कमी केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हन्ना ह्यूनने करत कॅनडाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये लालरेसमियामीने पेनल्टीवर शानदार गोल नोंदविला. भारताने अखेरपर्यंत 3-2 अशी आघाडी कायम राखत विजयसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.