(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ.नमिता कीर यांच्या हस्ते वाङमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन उपस्थित होते.महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रास्ताविक श्रेयस आग्रे या विद्यार्थ्यांने केले व वैष्णवी बाणे, मनीष नांदगावकर, श्रद्धा आंबरे, भार्गवी मांडवकर या विद्यार्थ्यांनी वाङमय मंडळाची आवश्यकता या विषयावर आपले अनुभव आणि मते मांडली.
सौ.नमिता कीर यांनी विद्यार्थ्यांना समर्पक शब्दात संबोधित करताना वाचन करत रहा, कलागुण जोपासा, वाढवा, समृद्ध करा असा मोलाचा सल्ला दिला. ‘गझलगाथा’ हे त्यांचं संपादित पुस्तक त्यांनी वाङमय मंडळाला भेट म्हणून दिले. दिनकर पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला,त्यांना शुभेच्छा दिल्या.प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी देखील मोजक्या शब्दात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत साहित्यिक गुण जोपासण्याविषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला १४२ विद्यार्थी उपस्थित होते. भारत शिक्षण मंडळाच्या गुरुकुल चे प्रबंधक मनोज जाधव, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, इतर प्राध्यापक वर्ग यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख अनन्या धुंदूर यांनी केले हिंदी विभाग प्रमुख कस्तुरी मोहित यांनी आभार मानले.