( मुंबई )
एसटी महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम, पुनर्बांधणी व आधुनिकीकरणासह सीएनजीवरील नव्या बसेस आणि डिझेलवर धावणाऱ्या बसेसचे सीएनजीमध्ये रुपांतर करण्यासाठी एसटी महामंडळाला २९८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
राज्याच्या यंदाच्या बजेटमध्ये एसटी एस टी महामंडळासाठी मोठ्या घोषणा महाराष्ट्र जय सेवेसाठी प्रवाशांच्या राज्य परिवहन महाराष्ट्र केल्या होत्या. महाविकास आघाडीने मागील दोन वर्षांत महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४१०७ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. एसटी महामंडळात तीन हजार नवीन बसेस व बस स्थानकांच्या दर्जात वाढ, आगारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. एसटीच्या बस आगारांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. डिझेलच्या वाढत्या किमती व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नव्या सीएनजी बसेसची खरेदी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या बजेटमध्ये महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाला हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.