(मनोरंजन)
सिनेसृष्टीत महत्त्वाच्या आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये हिंदी विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
१. सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगन ( तान्हाजी द अनसंग वॉरियर) आणि अभिनेता सूर्या
२. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – तुलसीदास जूनियर
३. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालामुरली (सोरारई पोटारू चित्रपटासाठी)
४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – बिजू मेनन
५. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- मल्याळम दिग्दर्शक सच्चिदानंद के आर (अय्यप्पनम कोशियुम)
६. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लक्ष्मी प्रिया चंद्रामौली (शिवरंजिनीयम इनुम सिला पेंगलुम या चित्रपटासाठी)
७. सर्वोत्कृष्ट मेंशन ज्युरी अवॉर्ड बालकलाकार वरुण बुद्धदेव
८. मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट – मध्य प्रदेश ९. स्पेशल मेंशन स्टेट उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
१०. बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा अवॉर्ड – द लॉन्गेस्ट किस
११. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- सोरारई पोटारू
१२. सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म- द अनसंग
१३. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – नानचम्मा
१४. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक राहुल देशपांडे (मी वसंतराव या चित्रपटासाठी) १५. सर्वोत्कृष्ट गीतकार- मनोज मुंतशिर.