(रत्नागिरी/प्रतिनिधी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या निशा केळकर यांची इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या प्रतिष्ठेच्या शिक्षक संवर्गातील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. कोलकत्ता विद्यापीठाच्या प्रोफेसर अनिर्बन कुंडू यांचे मार्गदर्शनाखाली ग्रुप थिअरी या सैद्धांतिक विषयात प्रा.केळकर या काम करीत आहेत. त्यांच्या संशोधनाचा अहवाल अॅकॅडमीने मान्य केला असून पुढील संशोधन कार्यही सुरू आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती म्हणूनच महत्वाची समजली जाते. र. ए. सोसायटीचे पदाधिकारी तसेच प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रा. केळकर यांचे अभिनंदन केले.