कोलकाता स्वदेशी बनावटीची आयएनएस दुनागिरी युद्धनौका नौदलाकडे शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हुगळी नदीत आयएनएस दुनागिरीचे जलावतरण करण्यात आले. उत्तराखंडमधील एका शिखराच्या नावावर असलेली ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स शिपयार्डने बनवली आहे.
नौदलासाठी एकूण ७ शिवालिक क्लास फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत. यापैकी ४ मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे, तर उर्वरित ३ जीआरएसई येथे बांधण्यात येत आहेत. दुनागिरी युद्धनौकेतील ७५ टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी युद्धनौकेची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे.