(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचालित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या प्रशालेत प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ पासून इयत्ता ५ वी सेमी इंग्लिश चा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. सेमी इंग्रजी सुरु करण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिलेल्या सरफराज हुसैन चिलवान यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रहीम माद्रे, इलीयास माद्रे, गणी खतीब, शफी चिकटे, तौफिक चिकटे, अजिज वागळे, नकाश पिलपिले,माजी जनरल सेक्रेटरी अ.शकूर चिलवान, माजी अध्यक्ष ईब्राहिम मुल्ला,अजिज मुकादम, मजिद पागरकर, मुनाफ वागळे, खाली पागरकर, सरपंच उषा सावंत, ग्रामपंचायत सदस्या बानू खलपे, डॉक्टर अनिलकुमार कांबळे, डॉक्टर मयुरेश मोहिते, प्रकाश वंजोळे, ग्रामसेवक श्री जाधव, कुडलीचे ग्रामस्थ सर्वश्री रमेश भिंगार्डे,अभिजित शेटये, जवाहर शेटये, अमित सुर्वे, प्रशांत सुर्वे आदी या कार्यक्रमास बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते.
इयता पाचवी व आठवीच्या नवोदित विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने शैक्षणिक किट देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी सर्व नवोदित विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाच्या निनादात स्वागत केले. सर्वांचेअध्यक्ष रहीम माद्रे यांनी स्वागत केले. डॉ.कांबळे यांनी नवोदित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विनोद पेढे, अविनाश केदारी, राजेश पोवार, सौ.ऋतुजा जाधव, सौ. सुवर्णा सावंत, नौशाद मुल्ला, राजेंद्र कदम, अकबर पागरकर यांनी परिश्रम घेतले.