(रत्नागिरी)
मारुती मंदिर येथील मारुतीचे मंदिर हटवण्यावरून रत्नागिरीत वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडिया मधून बातमी प्रसिद्ध होताच मारुती भक्त आणि असंख्य रत्नागिरीकर काल मारुतीच्या मंदिरात जमले होते. प्रशासनाने घेतलेल्या मारुती मंदिर हटवण्याचा निर्णयाचा राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. बंटी वणजू यांनी खरपूस समाचार घेत आमदार, खासदार यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, ‘मारुती मंदिरचा मारुतिराया उठवणार….’ तो तिथून कसा हलवतात ते आम्हीही बघतो. समस्त रत्नागिरीतील शेकडो भाविकांची श्रद्धा असलेला हा देव कुठेही जाणार नाही आणि कुणी हलवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण रत्नागिरीकरांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे.
मंत्र्यांनी आणि खासदारांनी मुंबई गोवा हायवेवरील स्वतःच्या इमारती जश्या वाचवल्या तसेच मारुती मंदिरही न हलवता तिथेच ठेवण्याचा आदेश शासनाकडून पारित करून घ्यावा. न चालू झालेले विमानतळ असेल… रखडलेले बस स्टॅन्ड असेल किंवा न येणारे नवीन उद्योग हे आणि शहरातील अनेक प्रश्न अजून बाकी असताना नको असलेली काम करून त्यातून फायदा मिळवण्याचा नवीन उद्योग नगरपरिषदेने काढला आहे का? असा खडा सवाल ही अॅड. बंटी वणजू यांनी प्रशासनाला केला आहे.
रत्नागिरी शहराचीची शान असलेलं आणि पूर्वीपासून जी रत्नागिरी शहराची हद्द दाखवण्यात आलेली आहे ते वेशीवरील मारुतीचे मंदिर जर प्रशासनाने हलवण्याचा प्रयत्न केला तरी रत्नागिरीकरांसाठी पुन्हा एकदा केस अंगावर घेऊ आणि उग्र आंदोलन करू असा इशाराच अॅड. बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे.