(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी येथील रसिक रंजन नाट्य मंडळ मुंबई यांच्या वतीने दशरथ राणे लिखित आणि प्रकाश परब दिग्दर्शित, रक्त पिपासू नराधमांच्या कचाट्यात सापडलेल्या निरपराध अबलेची मन हेलावून टाकणारी हृदयस्पर्शी कहाणी “एखाद्याचा भाग्यविधाता” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रविवार दिनांक १२ जून२०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजता दामोदर नाट्यमंदिर परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
नाट्य प्रयोग पाहण्यासाठी नाट्य रसिक श्रोत्यांसाठी अत्यल्प म्हणजेच रु १५० आणि १०० तिकीट दर ठेवण्यात आला आहे. तिकिट देण्याची व्यवस्था नाट्यमंदिराच्या ठिकाणी करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नाट्य रसिक प्रेमींनी नाटक पाहण्यासाठी यावे असे मंडळाच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.
प्रथमच मुंबई येथे भव्य अशा नाट्यगृहात नाट्य प्रयोग होत असल्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व सभासदां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.