(देवरूख/सुरेश सप्रे)
केंद्र शासनामार्फत ADlP अंतर्गत दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. पात्र ठरलेल्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यासाठी सुची बनवण्यात आली. त्यांची ऑनलाईन नोंदणी करून पात्र लाभार्थींना फोटोसह पावतीही देण्यात आली होती.
मात्र २ महिने झाले तरी अद्याप दिव्यांगाना ते वाटप करण्यात आलेले नव्हते. साहित्य मात्र धूळ खात पडून होते. पावसाळ्यात या साहित्याला गंज चढून ते खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रत्यक्षात दिव्यांग व्यक्तींना याचा लाभच होणार नव्हता. अशावेळी या साहित्याचा उपयोग काय? अशा आशयाचे वृत्त ‘रत्नागिरी 24 न्यूज’ने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी प्रसारित केली होती.
या वृत्ताची दखल घेत उद्या 1 जूनला या साहित्याचे वाटप पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली, देवरूख येथे करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थीनी मुळ पावती, आधार कार्डसह सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उपस्थित राहून साहित्य प्राप्त करावे असे आवाहन करण्यात आले आहे.